Top News महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

…म्हणूून मी आरएसएसच्या कार्यक्रमाला गेलो होतो; नितेश राणेंनी सांगितलं कारण

Loading...

मुंबई | माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आरएसएसची विचारधारा समजून घेण्यासाठी मी संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो, अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे.

नितेश राणेंना ओळखणारे ट्रोल करणार नाहीत, असं नितेश राणेंनी सांगितलं आहे. देवगडच्या जमसंड येथे दरवर्षी संघाकडून विजयादशमीनिमित्त संचलन केलं जातं. संघाच्या कार्यकर्त्यांबरोबर मांडी घालून जमिनीवर बसल्याचं दिसून आलं.

Loading...

नितेश राणेंना संघाच्या कार्यक्रमात पाहून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या फोटोवरुन सोशल मीडियावर त्यांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे. त्यावर नितेश राणेंनी स्पष्टीकरण दिलंय.

कणकवलीत शिवसेनेचे सतीश सावंत यांच्या विरोधात भाजपने नितेश राणेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यावर, माझ्यापुढे कोणतंही आव्हान नाही. लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा हक्क सगळण्यांना आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

 

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या