नितेश राणे-रामदास कदम वाद चिघळला; नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट

Nitesh Rane
नितेश राणे

मुंबई |नितेश राणे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर कुत्र्याचा फोटो टाकत रामदास कदमला यापुढे हाच उत्तर देईल, अशी जहरी टीका केली आहे. 

टक्कर बरोबरीची झाली पाहिजे, बिचाऱ्या ‘झुको’ वर अन्याय नको, आता होऊ दे कांटे की टक्कर, असे म्हणत पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे. 

नितेश राणे यांनी शुक्रवारी एक ट्वीट करत रामदास कदम यांना कुत्र्याची उपमा दिली होती. तर “निलेश हाच कुत्रा आहे”, असा पलटवार पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला होता.

दरम्यान, नारायण राणेंची शिवसेनेवर बोलण्याची लायकी नाही, ते काँग्रेसमधून भाजपत गेले आहेत आणि आता त्यांना आठवलेंचा पक्ष बाकी आहे, अशी खोचक टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या –

-अमित शहांना दुर्बिण भेट देणार – कपिल सिब्बल

-“… तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आज भाजपमध्ये असते”

-68 लाख युजर्सचे वैयक्तिक फोटो सार्वजनिक; फेसबुकनं मागितली माफी

-अमित शहा अहंकारी; पाच राज्यांच्या निकालानंतर मोदी-शहांना पक्षातूनच ‘विरोध’!

-निवेदिता माने आज शिवसेनेत प्रवेश करणार!