मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी आज सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक केलीये. या घटनेनंतर भाजपा नेते नितेश राणे यांनी राज्य सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
नितेश राणे यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये इंटरेस्ट सकट हिशोब होणार असल्याचं म्हटलंय. त्यांचं हे ट्विट अर्णब गोस्वामी यांच्या अटकेशी संबंधीत असल्याचं म्हटलं जातंय.
“Satta” aaj hai.. kal nahi..
Aaj tumhari hai..Kal Humhari hogi..
Bus itna yaad rakhna!
Hisaab toh hoga..interest laga ke 😊😊— nitesh rane (@NiteshNRane) November 4, 2020
नितेश राणे लिहीतात, “सत्ता आज आहे तर उद्या नाही. आज सत्तेत तुम्ही आहात उद्या आम्हीही असू. फक्त एवढं लक्षात ठेवा. हिशोब तर चुकता होणार तोही व्याजासह…”
दरम्यान पोलिसांकडे यासंदर्भात कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिक चॅनलकडून करण्यात आलाय. अर्णब यांना अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात येणारे.
महत्त्वाच्या बातम्या –
आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नये- सुभाष देसाई
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक
“गेल्या 20 वर्षात प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला”
कोकणामधून शिवसेनेला हद्दपार करणार; नारायण राणेंचं वक्तव्य
कंगणा राणावतच्या अडचणींत वाढ; गीतकार जावेद अख्तर यांनी केला अब्रू नुकसानीचा दावा