Top News मुंबई राजकारण

“आता यांच्या मुलांची लग्न देखील आपल्याच पैशातून होतील असं वाटतंय”

मुंबई | मुंबई तसंच मुंबई पोलिसांच्या मुद्द्यांवरून कंगणा राणावत आणि शिवसेना यांच्यात वाद रंगला होता. यांनंतर मुंबई महापालिकेने कंगणाच्या मुंबईतील कार्यालयावर हातोडा चालवला. यांनंतर कंगणाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. या न्यायालयीन लढाईसाठी पालिकेला आतापर्यंत 82 लाख 50 हजार रुपये खर्च आलाय.

यावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी निशाणा साधलाय. कारण कंगणाविरूद्धच्या न्यायालयीन लढाईसाठी मुंबईकरांनी पालिकेच्या तिजोरीत कराच्या रूपात जमा केलेले पैसे खर्च होत असल्याचं माहिती अधिकाराअंतर्गत समोर आलंय.

नितेश राणे यासंदर्भात ट्विट केलं आहे. ते म्हणाले, “पेंग्विन आणि कंगणाच्या न्यायलयातील खटल्यासाठी मुंबईकर कर भरतात. आता अजून काय शिल्लक आहे. आता यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील असं वाटतंय.”

अभिनेत्री कंगणा राणावतच्या खटल्याप्रकरणी पालिकेच्या बाजूने ज्येष्ठ वकील आणि वरिष्ठ अधिवक्ता अस्पी चिनॉय न्यायालयात बाजू मांडतायत. आतापर्यंत त्यांनी 11 वेळा न्यायालयात बाजू मांडली असून प्रत्येक तारखेसाठी 7 लाख 50 हजार इतका खर्च आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘जान कुमार सानूला बिग बॉसमधून हाकला अन्यथा…’; मनसेनंतर शिवसेनेचाही आक्रमक पवित्रा

‘माझा मुलगा अवघ्या 15 मिनिटात झाला कोरोनामुक्त’; डोनाल्ट ट्रम्प यांचा अजब दावा

‘तुला थोबडवनार लवकरच, मुंबईत राहून कसं करिअर बनवतो तेच बघतो’; खोपकरांचा बिग बॉसमधील स्पर्धकाला इशारा

लवकरच मुंबईकरांसाठी लोकल सेवा होणार सुरु; ठाकरे सरकारने दिले संकेत

‘शरद पवारांनी तो प्रश्न केला आणि….’, तिकीट नाकारण्यासंदर्भात सुजय विखेंचा मोठा गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या