औरंगाबाद महाराष्ट्र

हर्षवर्धन जाधव यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचं आहे- नितेश राणे

औरंगाबाद | हर्षवर्धन जाधव यांना आमदार नाही तर खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचं आहे, त्यासाठी लागेल ती मदत करण्यास मी तयार आहे, असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे. ते लासूर येथील मराठा समाजाच्या कार्यक्रमात बोलत होते.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, त्यांच्याकडून आपण आदर्श घेतला पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

मराठा समजासाठी आवाज उठवणाऱ्यांंना आपण विधानसभा आणि लोकसभेत पाठवलं पाहीजे, असं देखील नितेश राणेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते अखिल मराठा समाजाच्यावतीनं ‘स्फूर्ती नायक’ पुरस्कार देऊन नितेश राणेंचा गौरव करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या-

ज्याच्या हाती चहाचा उष्टा कप द्यायचा त्याच्या हाती देश दिला; दिल्लीत पोस्टरबाजी

-“मुख्यंमत्री मला भावासारखे; पण भावानं लाथ मारल्यावर दुसरं घर शोधायला लागणार”

चंद्राबाबू नायडूंच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा; संजय राऊत चंद्राबाबूंना भेटले

“काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी जमिनीवर राहून काम करणाऱ्या नेत्यांना बळ द्या”

मुख्यमंत्र्यांना असं बोलणं शोभत नाही- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या