…तर भाजप-शिवसेना आमदारांना नीट घरी जाता येणार नाही!

Nitesh Rane
नितेश राणे

नागपूर | शिवजयंतीचा वाद वारंवार उकरुन काढू नये, अन्यथा त्या भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना नीट घरी जाता येणार नाही, असा इशारा काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी दिला. ते नागपुरात बोलत होते. 

शिवजयंतीच्या वादाचा मुद्दा नितेश यांनी सभागृहात देखील उपस्थित केला. शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी होते. हा वाद मिटला आहे. त्यामुळे कुणी हा वाद उकरुन काढू नये, असं ते म्हणाले. 

दरम्यान, शिवजयंतीच्या वादावरुन त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं. बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य यांची जयंती तिथीनूसार का साजरी करत नाहीत?, असा सवाल त्यांनी विचारला.