पुणे | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक पार पडली असून यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळालंय. मात्र या निवडणूकीत भाजपाला चांगलाच पराभव सहन करावा लागलाय.
दरम्यान या निवणडूकीत शिवसेनेला देखील यश न मिळाल्याने भाजप नेत्यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. भाजप नेते नितेश राणे ट्विट करत महाविकास आघाडी सरकारला टोला लगवलाय.
ठीक आहे आम्ही कमी पडलो!
पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा..
मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा..
बाकी मैदानात परत भेटूच !!— nitesh rane (@NiteshNRane) December 4, 2020
नितेश राणे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “ठीक आहे आम्ही कमी पडलो! पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा.. मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा..बाकी मैदानात परत भेटूच !!”
दरम्यान भाजपकडून करण्यात येणाऱ्या या टीकांना सत्ताधारी पक्ष काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; आदित्य ठाकरे यांनी केली मोठी घोषणा!
4 वर्षात पहिल्यांदाच जिओला धोबीपछाड; ‘ही’ कंपनी बनली नंबर वन!
भाजपचा पराभव झाल्यानंतर अमृता फडणवीस म्हणतात; “वाईट सुरुवात…”
उर्मिला मातोंडकरांचा आनंद गगनात मावेना; पाहा काय केलंय ट्विट!
कोरोना लसीची किंमत किती? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती
Comments are closed.