नितेश राणेंचे टीकेचे बाण, उद्धव ठाकरेंना बनवलं ‘महाराष्ट्राचा गजनी’!

मुंबई | काँग्रेस आमदार नितेश राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले आहेत. उद्धव ठाकरेंचं गजनीच्या रुपातील व्यंगचित्र त्यांनी रेखाटलं असून त्यावर ‘महाराष्ट्राचा गजनी’ असं लिहिलं आहे.

गजनी सिनेमातील आमीर खानच्या कोणत्याच गोष्टी लक्षात राहात नसतात म्हणून तो स्वतःच्या शरीरावर प्रत्येक गोष्ट लिहित असतो.

नितेश राणेंनी काढलेल्या व्यंगचित्राच्या अंगावरही ‘भाजप आमचा मित्रपक्ष आहे’, ‘शिवसेना सत्तेत आहे’,  ‘एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला विरोध’ अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या