शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचा आणि आरक्षण मिळवा!

मुंबई | आता आरक्षणासाठी एकच पर्याय, शिवसेनेला सत्तेतून खाली खेचा आणि आरक्षण मिळवा, असं काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहेत. 

सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी काल आरक्षणाला उशीर का होतोय यासंदर्भातील सिक्रेट जाहीर केलं. त्यामुळे शिवसेना जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत मराठा आणि धनगर समाजाला कुठलंच आरक्षण मिळणं शक्य नाही, असं ते म्हणाले आहेत. 

दरम्यान, शरद पवार यांच्या आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याच्या मुद्द्याचं समर्थन करत हा मुद्दा शिवसेनाप्रमुखांनी आधीच मांडल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते.