बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाळासाहेबांच्या न्यायाचा धडा घेत उद्धव ठाकरे राजीनामा देणार का?”

मुंबई | राज्यात कारवाईचा सपाटा सुरू असताना ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय आता ईडीच्या (ED) रडारवर आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे व रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे सख्खे भाऊ श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.

मुख्यमंत्र्यांचे मेहुणे व व्यावसायिक श्रीधर पाटणकर यांना जोरदार धक्का देत ईडीने त्यांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली. पाटणकरांवर झालेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगायला सुरूवात झाली आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पाटणकरांच्या कारवाईवरून मुख्यमंत्र्यांना पुरतं घेरलं आहे.

इतिहास सांगतो की, मनोहर जोशी यांच्या मुलावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला सांगितला होता. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मेहुण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. हाच नियम इथे लागू होतो की शिवसैनिकांचे नियम वेगळे आहेत? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, बाळासाहेबांच्या न्यायाचा धडा घेत उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तर पाटणकरांवरील कारवाई सूडबुद्धीने झाली असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

टेन्शन वाढलं! महाराष्ट्रातील Deltacron रूग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील कारवाईनंतर नाना पटोले कडाडले, म्हणाले…

‘आगे आगे देखिए होता है क्या’, नारायण राणेंनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना डिवचलं

Uddhav Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर ईडीची कारवाई, राजकीय वर्तुळात हालचालींना वेग

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More