बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर, फोटो शेअर करत म्हणाले…

मुंबई | राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून राज्यातील राजकारण तापलेलं आहे. विधानसभेत विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. तर दुसरीकडे विधानसभेच्या बाहेरही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील तूतू- मैं मैं दिसून आलं. भाजप नेते नितेश राणे (Nitesh rane) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेना (Aaditya Thackrey) म्याॅव म्याॅव असा आवाज काढत डिवचलं होतं. त्यावरून सध्या वाद पेटला आहे.

आदित्य ठाकरे सभागृहात प्रवेश करत असताना नितेश राणे यांनी म्याॅव म्याॅव असा आवाज काढला होता. त्यावरून अल्पसंख्याकं मंत्री नवाब मलिक यांनी नितेश राणेंंना ट्विट करत टोला लगावला होता. नवाब मलिक यांनी एक फोटो शेअर करत त्याला पैहचान कौन? असं कॅप्शन दिलं होतं. कोंबडीचं शरीर आणि मांजरीचं तोंड असा तो फोटो होता.

नवाब मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंनीही एक फोटो शेअर करत प्रत्युत्तर दिलं आहे. नितेश राणेंनी फोटो शेअर करत नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे. हा प्राणी फक्त भंगारातच आढळतो. ओळखा पाहू कोण?, असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. नवाब मलिक आणि नितेश राणे याच्यातील वाद अधिक पेटतान दिसत आहे.

दरम्यान, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली होती. त्याचवेळी आदित्य ठाकरे सभागृहात प्रवेश करत होते. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याॅव म्याॅव असा आवाज काढला होता.

 

थोडक्यात बातम्या-

माया इथंच संपत नाही! सुपेंकडे पुन्हा सापडलं ‘इतक्या’ लाखांचं घबाड

पंजाब सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांचं ‘इतक्या’ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार

‘एवढा स्टाफ काय करतो, काय झोपा काढतो काय’; अजित पवार संतापले

धक्कादायक! विधानभवनासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

धक्कादायक! ‘या’ भागात 2 वर्षाच्या चिमुकल्याला Omicronची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More