बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा अन् रोज उठून सलाम ठोकत बसा”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्या लॉकडाऊन करणार नाही पण परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा दिला. यावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंसह जितेंद्र आव्हाडांवर देखील निशाणा साधला.

जितेंद्र आव्हाड बरोबर बोलले. उद्धव ठाकरे बनणे अवघड आहे. कारण देव पण परत अशी चूक करायची हिंमत करणार नाही, अशी चूक एकदाच होते, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

महाराष्ट्राची वाट लावणे..महाराष्ट्र विकायला काढणे..कुटुंबापलीकडे नाही बघणे..म्हणजे महाराष्ट्र सांभाळणे म्हणतात, मग उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा आणि रोज उठून सलाम ठोकत बसा, अशी बोचरी टीका नितेश राणेंनी केला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

पुण्यात 6 ते 6 संचारबंदीचा पहिलाच दिवस अन् कोरोनाबाधितांचा आकडा काळजाचा थरकाप उडवणारा!

लसीकरणानंतर मद्यपान केल्यास विपरीत परिणाम होतात का? तज्ज्ञ डॉक्टरांचे स्पष्टीकरण

‘आयपीएल’ सुरू होण्यास फक्त 6 दिवस शिल्लक असताना; ‘या’ मैदानात खेळाडूंच्या आधी कोरोनाची ‘एन्ट्री’

सचिन वाझेंना दिलासा नाहीच; पोलीस कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ

हळद उतरली नाही तोच वाहिला रक्ताचा पाट, रक्तरंजीत घटनेनं सोलापूर हादरलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More