बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढेन- नितेश राणे

मुंबई | मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणावरून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी वरुण सरदेसाईंवर गंभीर आरोप केले. यावर प्रत्युत्तर देत नितेश राणे यांनी आरोप केलेत, ते सिद्ध करावेत नाही तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावं, असा इशारा वरुण सरदेसाईंनी दिला होता. यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

वरुण सरदेसाई यांनी आम्हाला नोटीस पाठवायची धमकी दिली. मात्र, त्यांनी नोटीस पाठवली तर आम्ही शिवसेनेची अनेक प्रकरणं बाहेर काढू, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

आम्ही 39 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल तर मग आम्हीदेखील रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणं बाहेर काढू का? ही माहिती बाहेर आली तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही, असंही नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, मी सुसंस्कृत कुटुंबातील आहे. मला राजकारणाची आवड आहे. पण आज जे आरोप केले तसे कामं माझ्याकडून घडणारही नाहीत, असं वरूण सरदेसाईं यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“देश नहीं बिकने दूंगा म्हणत मोदी सरकार एक एक करत सर्व विकतंय”

चिंताजनक! पुण्यात कोरोना रूग्णांना खाजगी रूग्णालयात बेड मिळेना

कोरोना लसीकरणासंदर्भात आनंद महिंद्रांनी मोदींकडे केली ‘ही’ मोठी मागणी

पाॅवर कट बत्ती गुल ; महावितरणाच्या कारवाईनं शेकडो गावं अंधारात

‘महाराष्ट्राने संयम सोडला तर…’; शिवसेनेचा कानडींना इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More