बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही घ्या शिवसेनेच्या बाटग्यांची यादी’; राऊतांच्या अग्रलेखाला नितेश राणेंचं प्रत्युत्तर

मुंबई | भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवलं जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार नितेश राणे आणि प्रसाद लाड यांच्यावर अग्रलेखातून केली. याला आता नितेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नितेश राणेंनी राऊतांच्या अग्रलेखाला जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. नितेश राणेंनी या संदर्भात एक ट्विट केलंय. शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी तशी लांब आहे. पण थोडी माहितीसाठी, असं म्हणत त्यांनी शिवसेनेतील आयारामांची काही नावे ट्विटमध्ये सांगितली आहेत.

सचिन आहीर – bks ची जबाबदारी राहुल कनाल – शिर्डी संस्था, आदेश बांदेकर – सिद्धिविनायक संस्था, उदय सामंत – कॅबिनेट मंत्री, अब्दुलसत्तार – मंत्री, प्रियांका चतुर्वेदी – खासदार यादी मोठी आहे, असं नितेश राणे म्हणालेत.

दरम्यान, डाके..रावते..रामदास कदम..शिवतारे..राजन साळवी, सुनील शिंदे दिसणार नाहीत सारखे जुने सैनिक दिसणार नाहीत..
स्वतः पवारांची लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना मोठी मोठी भाषण द्यायची, अशी टीका नितेश राणेंनी राऊतांवर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘अनेक संकटे आली पण उद्धव ठाकरेंनी हिंमत दाखवली’; पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

चक दे इंडिया ! भारतीय पुरूष हाॅकी संघाने रचला इतिहास; 49 वर्षानंतर उपांत्य फेरीत धडक

शिक्षणमहर्षी आणि माजी आमदार आलुरे गुरूजी यांचं निधन!

आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलं तर सोडत नाही- देवेंद्र फडणवीस

“फक्त 15 रूपयात नवा सातबारा, आता जमिनीच्या खोट्या नोंदीही करता येणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More