बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मौका सभी को मिलता है”; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भाषणापासून राज्यात भोंग्यावरून जोरदार वाद चालू झाला आहे. भाजप आणि शिवसेनेतील वाद भोंग्यांच्या मुद्द्यांमुळं अधिकच चर्चेत आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर मुंबईत शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर राज्यात वातावरण तापलेलं आहे.

मातोश्रीच्या कलानगर भागात सिग्नलजवळ शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. 100-200 शिवसैनिकांनी आपल्या गाडीच्या दिशेनं धाव घेतली आणि काही कळायच्या आत आपल्यावर हल्ला केला, असं कंबोज म्हणाले आहेत. त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

मौका सभीको मिलता है!, हम आपके साथ है मोहित कंबोज, असं ट्विट करत राणेंनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. राणे आणि शिवसेना वाद महाराष्ट्राला नवा नाही पण आता कंबोज प्रकरणावरून राणे आक्रमक झाले आहेत. कंबोज यांच्यावरील हल्ल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवि राणा यांच्या मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा म्हणण्याच्या घोषणेमुळं मातोश्री परिसराला छावणीचं स्वरूप आल्याचं पहायला मिळालं आहे.

थोडक्यात बातम्या –

आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या लेकींची कमाल; अंशू आणि राधिकानं रौप्यपदक पटकावलं

पालकांनो सावधान! लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय, तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला

“बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर…”; शरद पवारांनी कान टोचले

“…अन् प्रसाद ओक यांना पाहताच एकनाथ शिंदे पाया पडले”; पाहा व्हिडीओ

भल्या भल्यांची दात तोडणाऱ्या टायसननं भर विमानात प्रवाशाला धु-धु धुतला; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More