मुंबई | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 8 व्या स्मृतीदिनी राज्यातील सर्वच दिग्गजांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राणे पिता पुत्रांनी देखील बाळासाहेबांना अभिवादन केलं. तसेच बाळासाहेबांना अभिवादन करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
नितेश राणे यांनीही आज दोन ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नितेश यांनी उद्धव ठाकरे इंदिरा गांधींना अभिवादन करतानाचा फोटो ट्विट केला आहे.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या फोटोसमोरील राहुल गांधींच्या अशाच फोटोची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही?, असा खोचक प्रश्न नितेश राणे यांनी केलाय.
अख्खा दिवस गेला तरी काँग्रेस नेतृत्वाकडून बाळासाहेबांच्या पुण्यतिथीदिनी एक मेसेज किंवा ट्विटही काँग्रेस नेतृत्वाने केलं नसल्याचं नितेश यांनी म्हटलंय. तसेच, जर बाळासाहेबांनाही मान्य करत नसतील तर शिवसेनेकडे काय उरलं?, असं नितेश राणे म्हणालेत.
Entire day has passed n not a single message or tweet from the congress leadership on the death anniversary of the late Balasaheb Thackeray!
If Balasaheb is not even acknowledged then what’s left with the Shiv Sena??— nitesh rane (@NiteshNRane) November 17, 2020
महत्वाच्या बातम्या-
योगी सरकारचा मोठा निर्णय, 23 नोव्हेंबरपासून शाळा, कॉलेज सुरु
राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव बिलातून कुठलाही दिलासा नाही- नितीन राऊत
“इतकंच म्हणेन सदाभाऊ… तुम्ही गेल्या घरी सुखी राहा”
मराठवाड्यात शिवसेनेशिवाय कोणीही येऊ शकणार नाही- चंद्रकांत खैरे
‘बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार बळकट करा’; प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला