महाराष्ट्र मुंबई

“फडणवीसांनी बिहार आणलं, आता महाराष्ट्राला पण देवेंद्र फडणवीसच पाहिजे”

File Photo

मुंबई | बिहारमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. बिहारमधील यशाचं श्रेय बिहार निवडणुकीचे भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या नेत्यांकडून दिलं जात आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी देखील बिहारमधील यशाचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. नितेश राणे यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.  देवेंद्र फडणवीसांनी बिहार आणलं, आता महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीसच पाहिजेत, पुन्हा येणार.. येणारचं, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

देशातील जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. त्यामुळेच देशातील सर्वच पोटनिवडणुकांमध्ये भाजपला यश मिळालं, असं नितेश राणे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, भारत देश पुढे जातोय, त्याचे एकच उत्तर आहे ते म्हणजे भाजप, आणि भाजप महाराष्ट्र, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

संजय राऊतांचा गजनी झालाय, ते पराभव विसरतात- निलेश राणे

दुधात साखर विरघळावी तसं ज्योतिरादित्य भाजपमध्ये विरघळले- शिवराज सिंह चौहान

शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा लव सिन्हाला पराभवाचा धक्का!

“देवेंद्र फडणवीसांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा झाला”

 

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या