मुंबई | स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाच्या प्रस्तावावरून आज विधानसभेत गदारोळ झाला. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकांच्या गौरवाचा प्रस्ताव आणल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाच्या प्रस्तावावरून भाजपने आज विधानसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
भाजपला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते अनिल परब यांनी नितेश राणे यांचं सावरकरांबद्दल काय मत आहे हे ही विचारा, असा टोला लगावला होता.
दरम्यान, सावरकरांबद्दल माहिती घेतल्यानंतर त्यांच्याबाबत माझं मत बदललं आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“शिवसेनेला अडचणीत आणण्याची भाजपमध्ये ताकद नाही”
‘हिंसाचारावरून राजकारण करणं चुकीचं’; भाजपचं सोनिया गांधींना प्रत्युत्तर
महत्वाच्या बातम्या-
असुराचा वध करायला महाराष्ट्रातील रणरागिणी मागे हटणार नाही- रूपाली चाकणकर
माझ्या वाढदिवसानिमित्त सुट्टी जाहीर करा; ‘या’ अभिनेत्रीची मागणी
फडणवीसांवरील टीकेला मिसेस फडणवीसांचं उत्तर; आदित्य ठाकरेंना म्हणाल्या ‘रेशमी कीडा’
Comments are closed.