नारायण राणे कोणत्या मतदारसंघातून विधानसभा लढवणार?; नितेश राणे म्हणतात…

सिंधदुर्ग | भाजपचे सहयोगी खासदार नारायण राणे आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवणार आहेत हे नितेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे.

2014 च्या निवडणुकीत पराभव झालेल्या कुडाळ-मालवण मतदारसंघातूनच नारायण राणे पुन्हा विधानसभा निवडणूक लढवतील, असं नितेश राणेंनी स्पष्ट सांगितलंय.

नितेश राणेंनी कुडाळमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात नारायण राणे हेच आगामी उमेदवार असतील, असं सांगत तूर्तास इतर चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, 2014 ला शिवसेनेच्या वैभव नाईकांनी नारायण राणेंचा पराभव केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-पुण्याजवळील लोणी काळभोरजवळ भीषण अपघात; 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू

-“राष्ट्रवादी जळगावमध्ये इतक्या जागा लढवणार”

-“आघाडीच्या नेत्यांच्या घरी आम्ही भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण घेऊन गेलो नाही”

-नवी मुंबईकरांसाठी महापालिकेडून मोठी खुशखबर

-मुंबईतील सर्व जागा युतीच जिंकणार- देवेंद्र फडणवीस