बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अजित पवारांनी भाषेबाबत बोलणं म्हणजे राज कुंद्राने…’; नितेश राणेंची जोरदार टीका

सिंधुदुर्ग | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरीच्या पूरग्रस्त भागात पाहणी दौऱ्यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याने संताप व्यक्त केला होता. नारायण राणेंनी त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला होता. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणेंना नाव न घेता प्रत्युत्तर दिलं होतं. अशी भाषा कोणत्याही नेत्याने वापरली नसल्याचं अजित पवार म्हणाले. आता भाजप नेते नितेश राणेंनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे. म्हणून भाषेबद्दल अजितदादांनी बोलू नये, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. सिंधुदुर्गमध्ये ते बोलत होते.

आम्हीही विरोधात असताना दौरे केले होते पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठं आहे, तहसीलदार कुठं आहे, प्रांत कुठे आहे, याची विचारणा करत बसलो नाही. मात्र काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती, असंही अजित पवार म्हणाले होते.

दरम्यान, नितेश राणेंच्या टीकेवर अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

थोडक्यात बातम्या-

नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत- भास्कर जाधव

चिपळूण दौऱ्यावेळी अधिकाऱ्यांना झापत, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राणेंना अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

भाजप-मनसे एकत्र येणार का?; राज ठाकरे म्हणतात…

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात सीबीआयची मोठी कारवाई!

चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More