बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बेळगाव महापालिकेवर भगवा फडकला, मुंबई महापालिकेवरही भगवा फडकणारच”

मुंबई | बेळगाव महापालिकेमध्ये भाजपने मोठं यश मिळवलं आहे. याठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे. मुंबई महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्याचा निर्धार नितेश राणे यांनी केला आहे. “आज बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवला, उद्या तोच भगवा मुंबई महापालिकेवर फडकवणारच”, असं नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेत विजय मिळवण्यासाठी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिलं असल्याचं बोललं जात आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही भाजपसाठी खुप महत्वाची आहे. त्यामुळे जसा बेळगाव महापालिकेत विजय मिळवला त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेत देखील मिळवणार असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

गेल्या 35 वर्षांपासून बेळगाव महापालिकेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता होती. यावेळेस मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीला केवळ चारच जागांवर समाधान मानावं लागलं आहे. बेळगाव महापालिकेमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. यावेळी महापालिका निवडणुकीत भाजपने 58 जागांपैकी 36 जागांवर विजय मिळवला आहे.

दरम्यान, बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने मोठ्या प्रमाणात मराठी माणसांना उमेदवारी दिली होती, त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपने यश मिळवलं, असं सांगण्यात येत आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“माझा नवरा बलात्कारी नाही, त्यानं कुणाचंही आयुष्य उद्ध्वस्त केलेलं नाही”

“जितेंद्र आव्हाड तुम्हीही आता बॅग भरा”; किरीट सोमय्यांच्या हाताला नेमकं लागलंय काय???

प्रेयसीने न सांगता लग्न उरकल्याने तरूण गेला टेकडीवर अन्….; पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल!

अक्षय कुमारच्या घरातील ‘या’ व्यक्तिची प्रकृती खालावली; ICUमध्ये दाखल!

“मेहबूबसारख्या बलात्काऱ्यांना कधीही उठा काहीही करा अशी मूभा दिलीय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More