बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्राला शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महापूजा करावी, 28 नोव्हेंबर 2019 ला लागलेली पणवती दूर होईल”

मुंबई | राज्यात कोरोनाची दुसरी लाट कुठे ओसरत नाही तर अस्माना संकट ओढावलं आहे. राज्यातील कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा आणि महाड या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरडी कोसळल्याने अनेकांचे प्राण गेले आहेत तर काहींच्या घराता पाणी शिरल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

स्वतःचं मुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी काळा जादू आणि पूजा मुख्यमंत्री स्वतःच्या घरी करत असतात असं आम्ही ऐकतो. तशीच आता एकदा महाराष्ट्राला शांत करण्यासाठी महापूजा करावी, जेणेकरून 28 नोव्हेंबर 2019 ला लागलेली पणवती एकदाचीच काय ती दूर होईल, अशा शब्दात नितेश राणेंनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावाला भेट दिली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांशी मुख्यमंंत्र्यांनी संवाद साधताना त्यांना धीर दिला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

मला पॉर्न कंटेंटच्या कामासाठी…; पॉर्नोग्राफी प्रकरणी सई ताम्हणकरचं स्पष्टीकरण

महाड व तळीये गाव वसवण्याबाबत गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा, म्हणाले…

सुहागरातीसाठी फुलांनी सजवला बेड, नवरीनं पाहताच… व्हिडीओ तुफान व्हायरल

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीबाबत महत्वाची माहिती आली समोर

…अन् संपूर्ण गाव क्षणात गाडलं; आजोबांनी सांगितला काळजाचा थरकाप उडवणारा अनुभव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More