बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेच्या आमदारपुत्राचा मंदिरात अभिषेक, कोरोना हा जनतेमुळेच होतो का?”

मुंबई | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे सरकारने निर्बंध शिथिल केले होते. त्यामध्ये मंदिरे  उघडण्याला परवानगी दिली नव्हती. याच पार्श्वभूमीवर राज्यात विरोधी पक्षाने भाजपने मंदिरे चालू करण्यासाठी अनेक शहरात आंदोलन केलं. मात्र अशातच आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला होता.

जनतेसाठी मंदिर बंद आणि शिवसेना आमदार भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाही का?, फक्त जनतेमुळेच कोरोना होतो का?, यांनी कुठलं पुण्य केलं आहेत?, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

भाजपने आंदोलन करताना, पुण्यात आंदोलनकर्त्यांनी देशासाठी, धर्मासाठी.. भाजप.. भाजप, बोल बजरंगबली की जय, मंदिरांना बंदी, मदिरा विक्रीला संधी अजब हे सरकार, उघड दार उद्धवा, उघड दार उद्धवा, गणपती बाप्पा मोरया…मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बुद्धी द्या!, अशा घोषणा दिल्या.

दरम्यान, नितेश राणेंनी केलेल्या टीकेवर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा- गिरीश महाजन

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

“ताई…मुलींबद्दल सहानुभूती बाळगावी, चूक मान्य केल्यानं कोणी लहान होत नाही”

बाबो! विमानतळावर जिन्सला पिवळा रंग लावून, तपासणी केल्यानंतर दिसलं ते पाहून पोलिसही झाले हैराण!

ऑलिम्पिकनंतर पॅरालिम्पिकमध्येही भारताला भालाफेकमध्ये सुवर्ण, सुमित अंतिलने रचला इतिहास!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More