बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारायण राणेंनी सेना सोडली तेव्हा संजय राऊत बाथरूममध्ये लपले होते- नितेश राणे

मुंबई | भाजप नेते प्रसाद लाड यांची सेनाभवन फोडण्याची भाषा आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचा अग्रलेख यावरून सेना-भाजपमध्ये जुंपली आहे. अग्रलेखामध्ये राऊतांनी, भाजपमध्ये उपऱ्यांना आणि बाटग्यांना स्थान नव्हतं मात्र मूळ विचारांचे लोक भंगारात आणि बाटगे पालखीत बसून नाचवले जात आहेत. त्यामुळे पक्षाचा अंत:काळ जवळ आल्याची टीका केली होती. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

महामंडळं, पदं सगळ्या खास लोकांना, बाळासाहेबांचे निष्ठावंत दिसले नाहीत. बाटग्यांच्या माध्यमातून चालणारी शिवसेना असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच ज्यावेळी नारायण राणे यांनी सेना सोडली तेव्हा सामना समोरच्या सभेत संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते. समोर आले तर ततपप होतं होतं आणि आता धमक्यांची भाषा वापरली जात आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी तशी लांब आहे. पण थोडी माहितीसाठी, असं म्हणत त्यांनी शिवसेनेतील आयारामांची काही नावं ट्विटच्या माध्यमातून सांगितली आहेत. यामध्ये सचिन आहीर- बीकेसची जबाबदारी, राहुल कनाल- शिर्डी संस्था, आदेश बांदेकर- सिद्धिविनायक संस्था, उदय सामंत- कॅबिनेट मंत्री, अब्दुलसत्तार- मंत्री, प्रियांका चतुर्वेदी- खासदार, यादी मोठी असल्याचं राणे म्हणाले.

दरम्यान, नितेश राणेंनी केलेल्या टीकेला संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘एक आई म्हणून तुम्हाला विनंती करते…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा झाली व्यक्त!

बाबो! ‘या’ माजी मंत्र्याने केली तब्बल 6 लग्न, पत्नीनेच केला गुन्हा दाखल!

उत्तर प्रदेशमध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला फक्त विकास दिसेल- अमित शहा

…याच जिल्ह्यातील दुकानांच्या वेळेत वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!

‘मनसेसोबत युतीसाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More