बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर”

मुंबई | मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं. गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर भाजप नेत्यांनी टीका केली आहे. अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

देवेंद्रजींच्या जवळ जाणं हे तर लांब राहिलं. हे या गायकवाडला कोण सांगेल. पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू, जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, कुठे घालायची तिथे घाल, अशा शब्दात नितेश राणे यांनी गायकवाड यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

केंद्रातील भाजपने राज्य सरकारला मदत करायचं सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत वाटले. तर इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये, असा टोला संजय गायकवाडांनी लगावला होता. बुलडाण्यात ते बोलत होते.

दरम्यान, नितेश राणेंनी केलेल्या टीकेवर संजय गायकवाड काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण आता यावरुन राजकारण रंगण्याची शक्यता आहे. राणेंनी गायकवाड यांच्यावर टीका करताना थेट मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

कोरोनापासून वाचण्यासाठी काय खावं, काय खाऊ नये?, अत्यंत महत्त्वाची माहिती

कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला दिले हे 5 सल्ल

“100 कोटीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्यांना माफी नाही”

सुपर कोहलीचा राहुल त्रिपाठीने घेतला अफलातून झेल, पाहा व्हिडी

डोक्यात कुऱ्हाड घालून वहिनीने नणंदेची केली हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल घक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More