बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिंदू सणांवर निर्बंध लावून सणांचं महत्व कमी करण्याचा ठाकरे सरकारचा डाव- नितेश राणे

मुंबई | पश्चिम बंगाल सारखी परिस्थिती ठाकरे सरकारला महाराष्ट्रात निर्माण करायची आहे, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. राज्यात हिंदू सणांवर कोरोनाचे निर्बंध लावायचे, गतवर्षीच्या परिपत्रकावरील तारखा बदलून निर्बंध लावत असल्याचा आरोपही नितेश राणेंनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने गणेशोत्सवासंदर्भात नियम जारी केले होते. या संदर्भात नितेश राणेंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज भेट घेत सरकारने लावलेले निर्बंध रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

हिंदू सणांवर नियोजितपणे निर्बंध कसे लावायचे यावर ठाकरे सरकारने भर दिला आहे. पश्चिम बंगाल सारखी परिस्थिती ठाकरे सरकारला महाराष्ट्रात निर्माण करायची आहे. हिंदू सणांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा या सरकारला कोरोना आठवतो, असं राणे म्हणाले.

दरम्यान, अनेक ठिकाणी गर्दी होते आणि पार्ट्याही चालतात. बेस्टच्या कार्यक्रमाला गर्दी होते त्याच कार्यक्रमाला मुख्यमंत्रीही उपस्थित असतात. मेट्रोच्या कार्यक्रमाला गर्दी होती, ती गर्दी दिसली नाही. पण जिथे हिंदूंचे सण येतात तिथे यांना कोरोना कसा दिसतो?, असा सवालही राणेंनी उपस्थित केला.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवारांची मोठी घोषणा, वाचा काय सुरू, काय बंद?

मुख्यमंत्री आठ वाजता साधणार जनतेशी संवाद, पुण्यातील निर्बंधांबाबत घोषणा करणयाची शक्यता!

‘राजीव गांधींचं नाव हटवताच भारताला सुवर्ण मिळालं’; ‘या’ निर्मात्याचं वादग्रस्त वक्तव्य

मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस- यशोमती ठाकूर

इयरबर्ड्स घालून गाणी ऐकताना अचानक झाला स्फोट, तरुणाचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More