“संजय राठोडांचा राजीनामा घेतला म्हणजे महाराष्ट्रावर उपकार केले नाही”
मुंबई | शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आपला राजीनामा दिला. भाजपने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत संजय राठोड राजीनामा देत नाही तोपर्यंत अधिवेशन चालवू देणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र राठोडांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपली राजीनामा मुख्यमंत्र्यांना दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत राठोडांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं सांगितलं. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
संजय राठोडांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता. त्यांच्यावर कारवाईसुद्धा लवकर करायला पाहिजे होती. पूजा चव्हाणच्या चौकशीमध्ये काय झालं?, अरूण राठोड कुठं गायब आहे?, दोन वनखात्याचे अधिकारी होते त्यांचं काय झालं? तर अजुनपर्यंत एफआयआर दाखल का झाली या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी परिषदेत द्यायला हवी होती, असं नितेश राणे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांची उत्तरे देणं गरजेचं होतं मात्र तसं न करता त्यांनी राठोडांचा राजीनामा घेऊन महाराष्ट्रावर किती उपकार केले असं मुख्यमंत्री दाखवत होते. हे महाराष्ट्राचं दुर्देव असल्याचं म्हणत नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. याआधी नितेश राणेंचे वडील नारायण राणेंनीसुद्धा शिवसेनेवर टीका केली आहे.
दरम्यान, इथं कुंपणच शेत खातेय. संजय राठोड दोषी असून चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहजतेने संजय राठोड यांचा राजीनामा घेतलेला नाही. विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या दबावामुळे राजीनामा घ्यावा लागला आहे, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
“संजय राठोडांनी माझ्याकडे राजीनामा दिला पण विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केलं”
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर नारायण राणे म्हणाले…
“फक्त राजीनामा नव्हे…” चित्रा वाघ यांच्या ‘या’ नव्या मागणीने संजय राठोडांचा पाय आणखी खोलात!
संजय राठोडांनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का?; फडणवीसांनी दिलं आश्चर्यचकीत करणारं उत्तर
भाजपनं अतिशय घाणेरडं राजकारण केलं, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी- संजय राठोड
Comments are closed.