बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधानसभेत आज एक ‘कॉमेडी सम्राट’ पाहिला- नितेश राणे

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्यांवरून टीका होताना दिसली. यामध्ये भाजपने महाविकास आघाडी सरकारला कोपरखळ्या लगावल्या. भाजपने केलेल्या प्रश्नांना आणि टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून उत्तर दिलं. मात्र भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका केली आहे. अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

आज एक ‘कॉमेडी सम्राट’ विधानसभेत पाहिला आणि ऐकला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण झालेच नाही, अशा शब्दात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. त्यासोबतच “कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री”, असा उपरोधिक सवाल नितेश राणेंनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

कोरोना विषाणू सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ओळखत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. मात्र फडणवीसांनी त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंवर टीका केली. मुख्यमंत्र्यांना आता भरपूर दिवस झाले आहेत. पूर्वी ते नवीन होते. आता ते नवीन नाहीत, पण चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातलं अंतर हे मुख्यमंत्र्यांना अद्यापही लक्षात आलेलं नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान,राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला जी चर्चा झाली त्या चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री तासभर बोलत होते. पण या तासाभरात ते महाराष्ट्रात आले नाहीत. यामध्ये ते चीनमध्ये गेले, पाकिस्तानात गेले, अमेरिका, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, काश्मीरसह दक्षिणेतही गेले. मात्र महाराष्ट्रावर ते एकही वाक्य बोलले नसल्याचं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

 

थोडक्यात बातम्या-

…म्हणून महिला पोलिसाने दिली आपल्या पतीची सुपारी

‘सरकारला लाज वाटली पाहिजे’; प्रकाश राज यांची मोदी सरकारवर टीका

मुख्यमंत्र्यांना चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातलं अंतर लक्षात आलेलं नाही- देवेंद्र फडणवीस

धक्कादायक! कोरोनाची लस घेतलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

माझी थट्टा करा पण… मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं ‘हे’ कळकळीचं आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More