बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या सगळ्यांचे गॉडफादर उद्धव ठाकरे’; प्रदीप शर्मांना अटक झाल्यावर भाजपची टीका

मुंबई | मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एन्काऊंटर स्पेशलिस्ट आणि मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

अँटिलिया स्फोटकं प्रकरण किंवा मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात  अटक होणाऱ्या किंवा चौकशी केली जाणारा प्रत्येक जण शिवसेनेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित कसा काय?, हा फक्त योगायोग असू शकत नाही आणि तरी देखील आपण विचार करतोय की यांचा गॉडफादर कोण असेल?, ते उद्धव ठाकरे आहेत, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

देशातील उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर जिलेटीनच्या कांड्या भरून ठेवलेली कार सापडली होती. त्यावेळी त्या प्रकरणाची चौकशी करणारे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचाही समावेश होता. सचिन वाझे हे शिवसेनेते नेते आणि पदाधिकारी राहिले आहेत. त्यांना आता पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे. आता एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली असून त्यांना 28 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, प्रदीप शर्मा यांनी 2019 मधील शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रदीप शर्मा यांना शिवबंधन हाती बांधलं होतं. त्यामुळे आता विरोधकांनी यावरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडंल आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रातील ‘या’ तीन जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट

‘भीती कोरोनाची वाटायला हवी, लसीची नाही’, क्लिनिकल ट्रायलसाठी आलेल्या मुलांचा विश्वास

‘नवरा बायको भांडतात… नंतर एकत्र चहा पितात’; सेना-भाजप राड्यावर पाटलांचं सूचक वक्तव्य

शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही मिळणार शाळेत प्रवेश; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

‘यू आर दी मोस्ट ॲक्टिव्ह मेयर’ म्हणत राज्यपालांनी केलं ‘या’ महिला महापौरांचं कौतुक

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More