बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘काही लाज उरली असेल तर आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा’; नितेश राणे संतापले

मुंबई | वरळी येथे झालेल्या सिलेंडर ब्लास्टच्या घटनेवरून भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संताप व्यक्त केला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला व वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

वरळीतील गणपतराव जाधव मार्गावरील बीडीडी चाळ क्र.3 येथे 30 नोव्हेंबर रोजी सिलिंडरचा स्फोट झाला. वरळीत घडलेल्या या स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात असताना नितेश राणेंनीही या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे.

बीएमसी आणि राज्य सरकारच्या निर्लज्जपणामुळे सगळं कुटुंब नष्ट झाल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. स्थानिक आमदार आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना जर काही लाज उरली असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असा घणाघात नितेश राणेंनी केला आहे.

वरळी येथील स्फोटातील (Cylinder Blast At Worli) हा तिसरा मृत्यू आहे. आधी बाळ मग वडील आणि आता आई, असं म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे, राज्य सरकार व बीएमसीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षाचं सरकार म्हणजे महाविकास आघाडी”

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ची मोठी कारवाई; ग्राहकांना ‘इतकेच’ पैसे काढता येणार

‘…तरच कर्मचाऱ्यांना पगार वाढ मिळणार’; अनिल परब यांचा गंभीर इशारा

पोस्टाची भन्नाट योजना; बँकेपेक्षा मिळेल अधिक परतावा

चिंताजनक! Omicron मुळे ‘या’ महिन्यात येणार देशात तिसरी लाट?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More