बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मौका सभी को मिलता है’ म्हणत नितेश राणेंचा विरोधकांना इशारा

मुंबई | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणे वादात अडकले आहेत. जनआशिर्वाद यात्रेपासून वादाला सुरूवात झाली आहे. ते प्रकरण आता थोडं शांत झालं असतानाच त्यांचे पुत्र नितेश राणे आणि त्यांच्या आई यांच्या लुकआऊट नोटीस प्रकरणावरून राजकारण तापलं आहे.

एका कंपनीच्या तक्रारीवरून नितेश राणे आणि निलम राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर काढलं आहे. यावरून राज्यातील राजकारणात नवा वाद सुरू झाला आहे. नितेश राणे यांनी ती तक्रार नसून माझ्याविरोधात कसलीही लुक आऊट नोटीस निघाली नसल्याचं म्हटलं आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करून याबाबत खुलासा केला आहे. प्रत्येक वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ज्यांनी असं म्हटलं आहे, की माझ्या आणि माझ्या आईच्या विरोधात लुकआउट नोटीस निघाली आहे. त्या सर्वांना बदनामीच्या खटल्यासाठी तयार रहाण्याचा इशारा दिला आहे. पोलिसांनी जे जारी केलं आहे ते परिपत्रक आहे नोटीस नाही, असंही नितेश राणे म्हणाले आहेत. तसेच नितेश राणे यांनी ट्विटरवर सत्या चित्रपटातील डायलॉग शेअर करत विरोधकांना इशारा दिला आहे. ‘मौका सभी को मिलता है’, असं त्यांनी म्हटलंय.

नितेश राणे यांच्या या इशाऱ्याने आता राज्यातील राजकारण नव्या वळणावर आहे. आपल्या विरोधात बोललेल्या प्रत्येकाला कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. परिणामी विरोधी पक्षातील नेते नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या 

‘कोरोनाच्या दोन्ही डोसमुळे…’; केंद्र सरकारने दिली महत्त्वाची महिती

“घरकोंबड्या सरकारमुळे महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार सुरूये”

लालबागच्या राजाचं ऑनलाईन दर्शन घेता येणार, प्रसादही घरपोच मिळेल

पुतीन यांनी तालिबान सरकारला खडसावलं, म्हणाले…

गणेशोत्सवाआधीच राज्यात कोरोनाचा रूद्रावतार; रुग्णांचा आकडा पुन्हा 50 हजार पार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More