सिंधुदुर्ग | पोलिसांनी काही मेसेज ट्रॅप केले आहेत. त्यामध्ये वारकऱ्यांमध्ये साप सोडण्याची भाषा आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. या वक्तव्यावरून काँग्रेस आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं आहे.
ज्या हातांसाठी आम्ही आरक्षण मागत आहोत, त्याच हाताने वारकऱ्यांचे रक्षण ही करू शकतो, आम्ही साप सोडणारे कावळे नाहीत आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
दरम्यान, पोलिसांनी उगाच मराठा समाजाच्या तरूणांना नोटीस आणि केसेस टाकून त्रास देऊ नये, केस आणि नोटीस पाठवायचीच असेल तर पहिली केस माझ्यावर टाका, असंही त्यांनी म्हटलंय.
ज्या हातांसाठी आम्ही आरक्षण मागत आहोत..
त्याच हाताने वारकऱ्यांचे रक्षण ही करू शकतो..
साप सोडणारे कावळे नाही आम्ही..
आमच्या शिवाजी महाराजह्यांचे मावळे आहोत आम्ही!!— nitesh rane (@NiteshNRane) July 22, 2018
पोलिसांनी उगाच मराठा समाजाचा तरूणांना नोटीस आणि केसेस टाकून त्रास देऊ नये..
आम्ही अपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहोत..
केस आणि नोटीस पाठवायचीच असेल तर पहिली केस माझ्यावर टाका..
मी तयार आहे!!— nitesh rane (@NiteshNRane) July 23, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-वारकऱ्यांमध्ये साप सोडण्याचा प्लॅन; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाजात संताप
-पहिल्यांदाच या देशात जाणार भारतीय पंतप्रधान, 200 गायी देणार भेट!
-चिघळणाऱ्या मराठा आंदोलनास भाजप सरकारच जबाबदार- नारायण राणे
-मराठा मोर्चाच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
-तो व्हीप शिवसेनेच्याच दोन खासदारांनी टाईप केला होता?