बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला नाही औरंगजेबाकडे पाठवलं तर…’; नितेश राणे कडाडले

मुंबई | राज्यात अनेक मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असताना एमआयएमचे नेते व आमदार अकबरूद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यानंतर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आपला मोर्चा एमआयएमकडे (MIM) वळवला आहे.

अकबरूद्दीन ओवैसींनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवल्यावरून अनेक तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत एमआयएमला थेट आव्हान दिलं आहे.

मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर आम्ही शिवरायांचे मावळे नाहीत, असा इशारा देत नितेश राणेंनी टीका केली आहे. राणेंनी विस्फोटक ट्विट करत अकबरूद्दीन ओवैसींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, अकबरूद्दीन ओवैसींनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवल्यानंतर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. औरंगजेबाजी कबर हवीच कशाला? असं म्हणत हिंदू महासंघाने औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. तर नितेश राणेंनीही ट्विट करत टीका केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘नया है आप!’, अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या दीपाली सय्यदना मनसेनं सुनावलं

किम जोंग उनच्या उत्तर कोरियात कोरोनाचा विस्फोट; धक्कादायक आकडेवारी समोर

सावधान! लहान मुलांवर घोंगावतंय टोमॅटो फ्लूचं सावट, ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नका करू

…अन् सेहवागने बीसीसीआयला फटकारलं; वाचा काय आहे नेमकं प्रकरण

किरीट सोमय्यांच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More