बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितेश राणेंची प्रकृती खालावली; ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

सिंधुदुर्ग | गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार नितेश राणे राज्याच्या राजकारणामध्ये चांगलेच चर्चेत आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यातच आता नितेश राणे यांच्या छातीत त्रास होत असल्यानं त्यांना तात्काळ कोल्हापूरला हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या पथकासह कार्डियाक रूग्णवाहिकेतून नितेश राणे यांना कोल्हापूरला नेण्यात येत आहे.

नितेश राणे यांनी गेल्या काही दिवसांपासून छातीत त्रास होत असल्याची तक्रार केली  होती. रक्तदाब वाढल्यानं त्यांना कोल्हापूरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर नितेश राणे यांना कोल्हापूरला नेण्यात येत आहे. मात्र, नितेश राणे यांच्या आजारपणावर शिवसेेनेकडून टीका करण्यात आली आहे. राणे खरंच आजारी आहेत का? हा राजकीय आजार आहे?, असे प्रश्न शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आले आहेत.

नितेश राणे यांनी छातीत त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना ओरोस ग्रामीण रूग्णालयातून कोल्हापूरलाकडे नेण्यात आलं. मात्र, तळेरे येथे आल्यानंतर नितेश राणे यांच्या छातीत अधिकच त्रास होऊ लागल्यानं वाहनांचा ताफा काही वेळाकरीता थांबवण्यात आला. डॉक्टरांनी नितेश राणे यांना पेन किलरच औषध दिले. नितेश राणे यांना कोल्हापूरच्या सीपीआर रूग्णालयात नेण्यात येत आहे.

दरम्यान, नितेश राणे यांची तब्येत अगोदरपासूनच बरी नव्हती. परंतू न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ते पोलीस कोठडीत गेले होते. तसेच आम्ही न्यायालयामध्ये नमूद केलं आहे की, त्यांची नियमित तपासणी करा. डॉक्टरांना गरज वाटली तर उपचार केले जातील, नाही वाटलं तर हरकत नाही. न्यायालयाला माहिती देण्याचं आमचं काम होतं ते आम्ही केलं, असंही नितेश राणे यांच्या वकिलांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

“शिवाजी पार्क मैदानावर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं स्मृतीस्थळ उभारण्यात यावं”

बापलेकीचा भावनिक क्षण! सुप्रिया सुळेंनी स्वतःच्या हातांनी शरद पवारांना घातले बूट

लता दीदींच्या अंत्यसंस्कारावेळी शाहरुख खान थुंकला की फुंकला?, पाहा नेमकं काय घडलं

‘मला पुन्हा जन्म मिळाला तर…’; लतादिदींचा ‘तो’ भावनिक व्हिडिओ व्हायरल

लता मंगेशकर अनंतात विलीन, शिवाजी पार्कमध्ये झाले अंत्यसंस्कार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More