बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निलेश राणेंच्या नव्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ, म्हणाले…

मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सध्या ईडी कोठडीत आहे. 3 मार्चपर्यंत मलिकांना कोठडी सुनावली आहे. त्यामुळे मलिकांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. अशातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अगदी जवळचा असलेला नेता नवाब मलिक यांचा संबंध दाऊद इब्राहिमसोबत येतो. अशा व्यक्तीला शरद पवारांनी थारा द्यायला नको. हे सगळं पाहून दाऊद इब्राहिमचा फ्रंटमॅन नवाब मलिक हे असू शकतात, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिकांच्या अटकेनंतर शिवसेना सावधपणे साईडट्रॅकला झाल्याचं दिसत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. नवाब मलिकांच्या अटकेनंतर हे प्रकरण आणखीनच चिघळल्याचं दिसतंय.

दरम्यान, दाऊद इब्राहिम आणि मनी लाॅर्डिंग प्रकरणात नवाब मलिक यांनी ईडीनं अटक केली आहे. तेव्हापासून राजकीय वर्तळात अनेक आरोप-प्रत्यारोप होत असलेले पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

“लवासाप्रकरणी शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही”

“सरकार त्यांचं मुख्यमंत्री त्यांचे मग राऊतांना पंतप्रधान कार्यालय कशाला हवं?”

“उद्धव ठाकरे तात्काळ नवाब मलिकांचा राजीनामा घ्या, अन्यथा…”

…अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; युक्रेनमधील काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर

“भारतीयांनी तात्काळ कीव सोडावं”; भारतीय दूतवासानं दिल्या महत्त्वाच्या सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More