बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाचा दिलासा नाहीच!

सिंधुदुर्ग | शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (santosh parab) हल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर (Nitesh Rane) आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी नितेश राणेंवर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण यांच्याही अडचणी वाढल्या आहेत.

नितेश राणेंच्या (nitesh rane latest news) यांच्या अटकपूर्व जामीनावर आज (बुधवारी) सिंधूदूर्ग (sindhudurg) न्यायालयात सुनावणी हाेणार होती मात्र कोर्टानं आज सुनावणी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता उद्या वेळ मिळाल्यावर निर्णय घेण्यात येईल, असं कोर्टानं सांगितलं आहे.

संतोष परब हल्ल्याप्रकरणी, नितेश राणेंना अटक व्हावी अशी मागणी करण्यात आली असून, तशी पोलिसांत तक्रार देखील दाखल केली गेली आहे. अशातच आता न्यायालयाने संशयित आरोपीना अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, नारायण राणेंना कणकवली पोलिसांकडून चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. नितेश राणे हे नॉट रिचेबल असल्याने पोलिसांनी आता नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली.

थोडक्यात बातम्या – 

नारायण राणेंना पोलिसांकडून नोटीस; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सलमानच्या वाढदिवसाला जेनेलियाचा तुफान डान्स; पाहा व्हिडीओ

‘कोणीही अतिशहाणपणा शिकवू नये’; संजय राऊतांचा राणेंवर हल्लाबोल

‘…तर ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते’; आदित्य ठाकरेंचा सूचक इशारा

लेकाच्या पाठोपाठ आता बापही अडचणीत, नारायण राणेंना पोलिसांकडून नोटीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More