टिल्लू म्हणून डिवचणाऱ्या अजित पवारांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजप नेते नितेश राणेंचा (Nitesh Rane) टिल्लू उल्लेख करत त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. यानंतर नितेश राणे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.

नितेश राणेंनी ट्विट करत अजित पवारांना पुन्हा डिवचण्याच्या प्रयत्न केला आहे. त्यांनी गूगलला धरणवीर असं सर्च केलं तर नाव अजित पवारच येणार, असा खोचक टोला नितेश राणेंनी अजित पवारांना लगावला आहे.

लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केलं. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली आणि हे सिद्ध झालं की यांना औरंग्यावरची टिका सहन होत नाही. म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाहीत, अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीमहाराजांबाबत अजित पवारांनी वक्तव्य केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं. अनेकांनी अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी केली. यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत मी चुकीचं काही बोललो नाही मी माफी मागणार नाही, असं सांगितलं.

पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी नितेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांचा टिल्लू उल्लेख केला होता. टिल्ल्या लोकांनी मला असलं काही सांगायचं कारण नाही. त्यांची उंची किती, त्यांची झेप किती… त्यांना मी कशाला उत्तर देऊ. माझे बाकीचे प्रवक्ते वैगरे देतील उत्तर, असं अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-