बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरे सरकार करीना कपूर, कतरिना आणि दिशा पटानी यांच्याकडून पैसे देऊन ट्विट करून घेतात”

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी सहा कोटी खर्च करण्यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी यावरून ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. टीव्ही 9 शी बोलताना त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

महाराष्ट्र सरकारने अनेक खासगी एजन्सींना नेमलं आहे. रेन ड्रॉप नावाची एजन्सी आहे, ज्यामार्फत दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान अख्तर यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिले जात आहे. काही लोकांना तर शिवसेना भवनमधून फोन केले जात आहेत. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. छोटे कलाकार असतील तर दोन-तीन लाख आणि मोठे असतील तर 10-15 लाख इतके पैसे दिले जात आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

तुम्ही करीना कपूर किंवा कतरिना कैफ तसंच इतर कलाकारांची अलीकडची ट्विटस बघा. सगळ्याचे ट्विट एकसारखे आणि महाराष्ट्र सरकारबद्दल दिसतील. या बॉलिवूड सेलिब्रिटींकडून पैसे देऊन ट्विट करवून घेतले जात आहेत, पैशाचा आकडा इतका मोठा आहे की त्याचा विचारही केला जाऊ शकत नाही, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारने रिक्षावाल्यांचे 1500 रुपये अजून दिलेले नाहीत. गहू, तांदूळ देणार होते त्याचा एक दानाही मिळालेला नाही. साडेपाच हजारांचं पॅकेज जाहीर केलं होतं त्याचं काहीही झालेलं नाही, एक रुपयाही मिळालेला नसल्याचं नितेश राणे म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या- 

काळजी घ्या, धोका वाढतोय! नव्याने कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला, वाचा आजची आकडेवारी

विनाकारण बाहेर पडणारांनो ‘हा’ व्हिडीओ पाहा, बाहेर पडायची हिम्मत होणार नाही!

सर्वात जास्त प्रभावी मानली जाणारी ‘ही’ लस भारतात दाखल, जाणून घ्या कधीपासून मिळणार

व्हायरल झालेल्या ‘या’ व्हिडीओमागे आहे दर्दनाक कहाणी, तरीही लढतेय तरुणी

सोलापूरची तरुणी स्वत:च्या पॅाकेटमनीमधून करते असं काम की अभिमान वाटेल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More