लग्नाच्या 4 वर्षानंतर ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री घेणार घटस्फोट?

Niti Taylor | ‘कैसी ये यारियाँ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री नीती टेलर तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नितीने अचानक तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पतीचं आडनाव आणि त्याच्यासोबतचे फोटो काढून टाकले आहेत.

यामुळे सोशल मीडियावर सध्या चर्चेला उधाण आलं आहे. ‘कैसी ये यारियाँ’ या मालिकेमध्ये नीती आणि पार्थ समथान यांची जोडी खूपच प्रचलित झाली होती. त्यानंतर 2020 मध्ये नितीने लहानपणीचा मित्र परिक्षित बावाशी लग्न केलं.

मात्र, आता नीती (Niti Taylor) आणि तिचा नवरा परिक्षित यांच्यात बिनसल्याची जोरदार चर्चा आहे. नीतीने परिक्षितला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. इतकंच नाही तर, तिने तिच्या इन्स्टाग्राम युझरनेमवरून पतीचं ‘बावा’ हे आडनावसुद्धा काढून टाकलं आहे.

नीती टेलरच्या वैवाहिक आयुष्यात वादळ?

काही दिवसांपूर्वीच परिक्षितने त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केलं होतं. नुकतंच त्याने हे अकाऊंट पुन्हा अॅक्टिव केलंय. यासोबतच नीती हीने तिच्या अकाऊंटवरून परिक्षितसोबतचे बरेच फोटो आणि व्हिडीओसुद्धा काढून टाकल्याचं दिसून येतंय.

यामुळे नेटकरी आता वेगवेगळे तर्क-वितर्क लावत आहेत.नीतीने परिक्षितसोबत लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सगळं काही डिलेट केलंय.यामुळे तिच्या वैवाहिक आयुष्यात काहीतरी समस्या असल्याचं म्हटलं जातंय.

नीती टेलर लवकरच घटस्फोट घेणार?

‘या दोघांमध्ये नेमकं काय झालं असेल, तिने अचानक फोटो का डिलिट केले’, असा प्रश्न एका युजरने विचारला. तर ‘नीती तिच्या पतीसोबतचे फोटो, व्हिडीओ सतत पोस्ट करत होती. पण आता नक्कीच काहीतरी बिनसलंय’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

पाहायला गेलं तर, नीतीने (Niti Taylor) अद्याप याबाबत अधिकृत असं काहीच सांगितलं नाहीये. तीने ‘कैसी ये यारियाँ’, ‘गुलाल’, ‘प्यार का बंधन’, ‘ये है आशिकी’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच ती ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतही दिसून आली होती.

News Title – Niti Taylor and Parikshit Bawa Married Life

महत्त्वाच्या बातम्या-

ऐश्वर्याचे ‘ते’ फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल, लाईक्सचा पडला पाऊस

“काय समज द्या, समज द्या लावलंय”; भुजबळांनी भाजप नेत्यांना सुनावलं

निकालापूर्वीच मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा; थेट म्हणाले..

अनंत-राधिकाच्या लग्नात पाहुण्यांसाठी असणार खास ‘ड्रेसकोड’; लग्नपत्रिका आली समोर

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने घेतला मोठा निर्णय!