मुंबई | ह.भ.प. इंदुरीकर महाराज देशमुख एका वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या प्रकरणामुळे मला मनस्ताप झाला असून हा वाद इथेच थांबला नाही तर कीर्तन सोडून शेती करेन, असं इंदुरीकर म्हणाले होते. यावरून शिवसेना नेते नितीन बानुगडे पाटील यांनी इंदुरीकरांना पाठिंबा दिला आहे.
आम्हाला खात्री आहे आपला उद्देश आणि हेतू चांगलाच आहे त्यामुळे आपण थोडा काळ संयम ठेवायला हवा. महाराज संपुर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे, असं नितीन बानुगडे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
इंदुरीकर महाराजांनी समाजाला काय शिकवलं…?? हुंडा घेणं पाप आहे…. आपल्या आई बापाला विसरणं पाप आहे…आपली संस्कृती आणि परंपरा विसरणं म्हणजे पाप आहे…दारू पिऊन धिंगाणा घालणं पाप आहे…गाईला कसायाच्या हाती कापायला देणं पाप आहे, अशी पोस्ट नितीन बानुगडे पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, महाराज आपण कीर्तन सोडू नये. आपण कीर्तन सोडले तर महाराष्ट्राचे सामाजिक नुकसान होईल, आयुष्यात अनेकदा कौतुक होत असतं त्याप्रमाणे टीका देखील होणार, असंही नितीन बानगुडे पाटील यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
हा माझ्या शिवरायाचा महाराष्ट्र नाही; हिंगणघाटच्या पुनरावृत्तीने चित्रा वाघ संतप्त
हिंगणघाटची पुनरावृत्ती! लासलगाव येथे महिलेला जिवंत जाळले
महत्वाच्या बातम्या-
भाजपला मोठा धक्का! या खासदाराची खासदारकी जाण्याची शक्यता
“महाराज तुम्ही खचू नका, तुमच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र”
“महाराज कीर्तन सोडू नका, स्त्रियांचा आदर करायला शिकवा”
Comments are closed.