सातारा | सातारा लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार मानले जाणारे शिवसेना नेते नितीन बानुगडे उदयनराजे भोसलेंविरोधात लढणार नाहीत. छत्रपतींचा सन्मान म्हणून उदयनराजेंना बिनविरोध निवडून दिलं पाहिजे, असा पवित्रा शिवसेेनेनं घेतला आहे.
महाराष्ट्राच्या शिवसेनेची प्रचाराची जबाबदारी माझ्यावर आहे म्हणून मी उमेदवारीच्या फंद्यात पडणार नाही, असं नितीन बानुगडे म्हणाले आहेत.
खासदार, आमदारकीपेक्षा माझ्यासाठी शिवसेना सत्तेत येणं सगळ्यात महत्वाचं आहे, असंही नितीन बानुगडे म्हणाले.
दरम्यान, उदयनराजेंनी कोणत्याही पक्षातून लढू नये मात्र इतर पक्षातून निवडणूक लढवल्यास शिवसेना त्यांच्या विरोधात ताकदीनं लढेल, असं शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
–‘कॅप्टनकूल’ धोनी संघात परतणार, कोणत्या खेळाडूला डच्चू मिळणार?
-“शिवसेनेचे गुलाबराव पाटील लंगोट बांधत नाहीत तर खिशात घेऊन फिरतात”
–“माझ्या जिवाला काही बरं वाईट झालं तर जनता मोदींना जबाबदार धरेल”
-राहुल गांधी पाकिस्तानचे आहेत का?- नितीन गडकरी
–नरेंद्र मोदींच्या झंझावाताला ‘या’ तीन नेत्या ब्रेक लावणार?