महाराष्ट्र मुंबई

आव्हाडांना बडतर्फ करा अन्यथा लॉकडाऊन तोडून ठाण्यात घुसू; भिडेंच्या धारकऱ्यांची धमकी

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. यामुळे जितेंद्र आव्हाड यांचं नाव चर्चेत असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाही करा अन्यथा नाईलाजास्तव लॉक डाऊन तोडून ठाण्यात दाखल होणार आणि जित्याला धडा शिकवणार, अशी धमकी शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि भिडेंचे विश्वासू नितीन चौगुले यांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही. या घटनेबद्दल मला माहिती नाही. मी रात्री झोपलेला होतो. त्या दिवशी मी दिवसभर माझ्या विभागात काम करत होतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे. विरोधक जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत असून सोशल मीडियावरही संताप व्यक्त होताना दिसत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

डोनाल्ड ट्रम्प यांची WHO ला धमकी, म्हणाले…

कोरोनाचा संसर्ग वाऱ्याच्या वेगाने पसरतोय; देशातली बाधितांची संख्या पोहचली 5 हजारांवर

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी तीन प्रकारची वेगवेगळी रुग्णालयं; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

“लोकहो, घरात व्यायाम करा, ज्यांना त्रास आहे त्यांनी खाण्यावर नियंत्रण ठेवा; आपल्याला युद्ध जिंकायचंय”

“केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज नको”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या