बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दादा… दोन हाना पण मला आपलं म्हणा, आता माफ करुन अबोला सोडावा”

बारामती | दादा… आता सहन होत नाही, माफ करुन अबोला सोडावा, असं म्हणत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांची वर्तमानपत्रातून जाहीर माफी मागितली आहे. नितिन हिंदुराव देशमुख असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे.

पहाटेच्या शपथविधीनंतर अजितदादांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे नितिन हिंदुराव देशमुख यांच्यासोबत गेले दिड वर्ष अजित पवार बोलले नाहीत. त्यामुळे दादा दोन हाणा, पण मला आपलं म्हणा, असं नितिन हिंदुराव देशमुख यांनी म्हटलं आहे.

नितीन देशमुख यांनी अजित पवारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दादांच्या मनधरणीचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. दोन हाना, पण मला आपलं म्हणा, मला माफी, हेच तुमचं वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट, अशी जाहिरात नितिन देशमुख यांनी वर्तमानपत्रात दिली आहे.

दादा, तुमच्या वाढदिवसानिमित्त करतो एकच वादा झाली चूक, माफ करा…तुम्हाला दुखवण्याचा बिलकुल नव्हता इरादा. 23 नोव्हेंबर 2019 रोजी माझ्या हातून आयुष्यातील सर्वात मोठी चूक घडली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नको त्या घोषणा दिल्या. दादा, मी अपरिपक्व होतो, भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली.
दोन वर्षे मी स्वतःला पश्चातापाच्या अग्निकुंडात झोकून दिलं आहे. पण दादा, आता सहन होत नाही. संपूर्ण महाराष्ट्र आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छारुपी
आदरभाव व्यक्त करतोय, मलाही दादा आज मन मोठं करुन आशिर्वादरुपी माफीचं रिटर्न गिफ्ट द्या, असं नितिन देशमुख यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील ‘या’ भागात रेड अलर्ट जारी, पुढील 24 तास पाऊस झोडपून काढणार

CET परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठीची वेबसाईट बंद; अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार मुदतवाढ

‘वाद विकोपाला गेला तर आम्हाला दंगल काही नवीन नाही’; ‘या’ भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही- राजेश टोपे

‘रात्री अपरात्री लोकांचे फोन यायचे…’; खासदार मनोज झा यांचं मन सुन्न करणारं भाषण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More