बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खरंच चार्टर्ड प्लेनने आला होतात का?, ‘त्या’ फोटोंवर नितीन देशमुखांची प्रतिक्रिया

मुंबई | आमच्या आमदारांना बळजबरी गुवाहाटीला ठेवण्यात आलं असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. तर गुवाहाटीत असणारे शिंदे गटातील 21 आमदार आमच्या संपर्कात असून ते परत आमच्याकडे येणार आहेत, असा दावा देखील संजय राऊतांनी केला.

संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेत दोन आमदार शिंदे गटातून पळून आल्याची माहिती दिली. तर आमदार नितीन देशमुख यांनी सुरतहून कसं पळून आलो याची थरारक कहाणी सांगितली. मात्र, आता यात देखील ट्विस्ट असून शिंदे गटाकडून देशमुखांचा चार्टर्ड प्लेनमधून परत येतानाचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

चार्टर्ड प्लेनमधून आलात का? असा सवाल नितीन देशमुखांना विचारण्यात आला. त्यावेळी नितीन देशमुखांनी मुळ प्रश्नाचा बगल देत तिथून काढता पाय घेतला. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या कहाणीत किती तथ्य आहे, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, मला हार्ट अटॅक आल्याचा बनाव करण्यात आला होता. तसेच माझं बरंवाईट करण्याचा विचार होता, असा दावा नितीन देशमुखांनी केला होता. मात्र, देशमुखांचे चार्टर्ड प्लेनमधील व प्लेनसमोर थांबून काढलेले फोटो शिंदे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे देशमुखांनी केलेले आरोप खोटे असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.

थोडक्यात बातम्या-

एकनाथ शिंदेंच्या बंडाळीवरून अजित पवारांचं भाजपला क्लिनचीट, म्हणाले…

‘घरचे दरवाजे उघडे आहेत, चर्चा होऊ शकते’; संजय राऊतांचं बंडखोर आमदारांना आवाहन

मोठी बातमी! आणखी दोन आमदार गुवाहाटीसाठी रवाना, शिवसेनेतील गळती कायम

‘आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

“कॅरम खेळण्यापुरते सुद्धा आमदार उद्धव ठाकरेंकडे शिल्लक राहणार नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More