Top News

जो स्वत:चं घरं सांभाळू शकत नाही, तो देश सांभाळू शकत नाही- गडकरी

नागपूर | जो स्वत:चं घर सांभाळू शकत नाही, तो देश सांभाळू शकत नाही, असं परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. नागपूरमध्ये अभाविप कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते.

मला अनेक कार्यकर्ते येऊन भेटतात. भाजप पक्षासाठी आयुष्य देण्याची ते तयारी दाखवतात, पण मी त्यांना पहिल्यांदा घर सांभाळण्याचा सल्ला देतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

स्वत:च्या घरातील मुले, कुटुंब यांना जो सांभाळू शकत नाही, तो देश सांभाळू शकत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नागपूर येथे अभाविपच्या जून्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

महत्वाच्या बातम्या-

-“देशाच्या पंतप्रधानांचे कामकाज म्हणजे एका नव्या नवरी सारखे”

-आम्ही साधू संतांसोबत भव्य राम मंदिर बांधणार आहोत- अमित शहा

भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय, 4-1ने मालिका टाकली खिशात

-धोनीच आला मदतीला, केदारला दिलेल्या टीप्समुळे सामन्याला कलाटणी

-उदयनराजेंनी सैन्यातील जवानाला दिली ‘एअर लिफ्ट’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या