बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अॅम्ब्युलन्सच्या सायनरचा आवाज बदलणार, आता वाजणार ‘ही’ नवी धून

पुणे | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी अलिकडेच गाड्यांच्या हार्नबाबत घोषणा केली होती.  गाड्यांच्या हार्नच्या आवाजामध्ये तबला, पेटी, बिगूल, व्हॉयलीन, तानपुरा, बासरी यासारख्या वाद्यांचा समावेश असणार आहे. त्यानंतर आता अॅम्ब्युलन्सच्या सायनरचा आवाज देखील बदलण्याचा महत्वाचा निर्णय नितीन गडकरी यांनी घेतला आहे. ते पुण्यातील कार्यक्रमात बोलत होते.

मी नागपुरात 18 व्या मजल्यावरील फ्लटमध्ये राहतो. मी रोज एक तास प्राणायम करतो. तेव्हा मला पहिल्यांदा लक्षात आलं की, गाड्यांच्या हार्नमुळे किती त्रास होतोय. याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यवर देखील होतो. जर्मन संगीतकाराने आपल्याकडे आकाशवाणीची एक ट्यून तयार केली होती. ती सकाळी साडेपाच वाजता वाजायची. त्यानंतर ती ट्यून मी शोधून काढली. त्यानंतर मी ही ट्यून आता अॅम्ब्युलन्सवर लावण्यासाठी एक ऑर्डर काढणार आहे, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

आकाशवाणीची ही ट्यून अॅम्ब्युलन्सवर लावल्यावर ऐकायला ती चांगली वाटेल. रस्त्यावरून येत असताना सर्व रस्ते बंद केल्यामुळे मी चंद्रकांतदादांना म्हटलं होतं की आपापल्या बरं वाटतं ना? आपल्यामुळे रस्ता बंद केल्यामुळे सगळे लोक आपल्याला शिव्या देत असतील. त्यामुळे दरवेळेला रस्ता बंद करू नका, असंही नितीन गडकरी म्हणाले होते.

दरम्यान, वायु प्रदूषणाबरोबर सध्या ध्वनी प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. अनेक वाहकचालक इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांच्या गाडीच्या हार्नचा आवाज मोठ्याने करतात. यामुळे वाहनचालकांचं वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याच्या घटना घडतात. या हार्नच्या जागी वाद्यांचा वापर केला जाईल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या-

[email protected],000! शेअर बाजाराची ऐतिहासिक वाटचाल; निफ्टीची विक्रमी उसळी

‘दुपारी 3 ते सायंकाळी 7 पर्यंत शेतात काम करु नका’; ‘या’ जिल्ह्याच्या प्रशासनाने दिले आदेश

पुढील पाच दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

“राज्यपालांनी सरकारला त्यांची चुक दाखवून दिली, नाहीतर…”

आई तू इतकी क्रूर कशी झाली?, वारंवार दूध मागितल्याने बाळाला आपटलं; लेकराचा जागीच मृत्यू

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More