बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींनी दिलेला आधार उद्योग क्षेत्र कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचं केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वागत केलं आहे. पंतप्रधानांनी लघु उद्योग, कुटीर उद्योग तसंच ग्रामीण उद्योग दिलेली चालना आणि आधार उद्योग क्षेत्र कधीही विसरणार नाही, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे. संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजने मोठा दिलासा मिळेल, असं ते म्हणाले.

उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या 11 कोटींहून अधिक नागरिकांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. भारत लवकारत लवकर या संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास व्यक्त करताना आर्थिक शक्ती बनू आणि विकासाच्या मार्गावर जाऊ, असंही गडकरी म्हणाले.

देशाच्या अर्थव्यवस्थेत लघु उद्योगाचा वाटा हा 39 टक्क्यांचा आहे. येत्या काळात हे योगदान अधिक वाढेल. या संकटातून बाहेर पडून आपण ऐतिहासिक विकास करू, असं गडकरी म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

लाॅकडाऊन 4ची घोषणा कधी होणार?, नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

महत्वाच्या बातम्या-

आत्मनिर्भर पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल- चंद्रकांत पाटील

…तर 105 आमदारांचे 50 व्हायला वेळ लागणार नाही; एकनाथ खडसेंचा पक्षनेतृत्वाला इशारा

बहुजन नेतृच्व खच्ची करण्याचा प्रयत्न, भाजपात लोकशाही राहिली नाही- एकनाथ खडसे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More