“विरोधकांकडून पंतप्रधान पदाची ऑफर होती, पण..”; नितीन गडकरींचा मोठा खुलासा

Nitin Gadkari | भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा खुलासा नितीन गडकरी यांनी केला आहे. राजकीय वर्तुळात सध्या त्यांचं हे विधान चर्चेत आलं आहे. (Nitin Gadkari)

नागपुरात झालेल्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी मला विरोधी गटातील एका बड्या नेत्याने ऑफर दिली होती. तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण त्यावर मी त्यांना विचारलं की, तुम्ही मला पंतप्रधानपदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी हा पाठिंबा का घ्यायला हवा?, मी त्या नेत्याला स्पष्ट सांगितलं की, पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे.हीच तत्व भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे,” असं गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट

गडकरी यांनी बोलताना हा नेता नेमका कोण होता?, त्याचं नाव काय होतं, याबाबत काहीच खुलासा केला नाही. त्यांनी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एका वरिष्ठ विरोधी पक्ष नेत्याने माझ्याशी संपर्क साधला होता, असं म्हटलं. आता हा नेता कोण असेल याबाबत चर्चा रंगत आहेत.

गडकरी यांना पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली. मात्र, त्यांनी ती ऑफर नाकारली. त्यामुळे पुन्हा एकदा देशात आणि महाराष्ट्रात गडकरींच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. 2014 पासून नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतरही एनडीए सरकारमध्ये पंतप्रधान पदाची सूत्रे मोदींच्या हातात देण्यात आली. अशात गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी यांच्यानंतर योगी आदित्यनाथ, अमित शाह यांच्या नावांची पंतप्रधानपदासाठी चर्चा होत आहे.त्यात आता नितीन गडकरी यांचंही नाव सामील झालं आहे.

News Title- Nitin Gadkari Big revelation

महत्त्वाच्या बातम्या-

सर्वसामान्यांना झटका! खाद्य तेलाच्या दरात झाली मोठी वाढ

महादेवाच्या कृपेने आज ‘या’ 5 राशींना लाभच लाभ मिळणार!

अखेर अनन्याकडून आदित्य राॅय कपूरसोबतच्या ब्रेकअपबद्दल खुलासा!

ईद-ए-मिलाद-उन-नबी 2024 कधी साजरा होणार; जाणून घ्या योग्य तारीख

Aadhar Card वापरकर्त्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर!