बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…पण अर्थव्यवस्था देखील पहावी लागेल, लॉकडाऊनवर गडकरींचं रोखठोक मत

नवी दिल्ली |  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत दोनवेळा लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. लॉकडाऊनला आता जवळपास दीड महिना झाला आहे. आणि या लॉकडाऊन मुदत आणखी आठवड्याने संपत आहे. अशा परिस्थितीत आता कोरोनाचे संकट मोठे आहे आणि सरकारही गंभीर आहे. मात्र, देशाची अर्थव्य़वस्थाही पहावी लागेल, अशा शब्दात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी लॉकडाऊनवाढीच्या विरोधाचे संकेत दिले आहेत.

लॉकडाऊनला लोकांनी गंभीरपणे घेतलेले आहे. यावरून लोक कोरोनालाही गंभीरतेने घेत असल्याचं दिसत आहे. अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठीही काम केलं जात आहे. यासाठी छोट्या उद्योगपतींची काळजी घेण्यात येत आहे, असं गडकरींनी सांगितलं.

कोरोना व्हायरसला हरवण्यात देश यशस्वी होईल. आपण लवकरच कोरोनावर विजय मिळवणार आहोत. देशही या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडेल. सरकारचे प्रत्येक विषयाकडे लक्ष आहे. मजूर पायी जात आहेत, याचाही विचार सरकार करत असल्याचं गडकरी म्हणाले.

कोरोनाच्या संकटामुळे भारतासमोर एक सुवर्णसंधी आहे. जग चीनवर नाराज आहे. आमचे मंत्रायलही यावर विचार करत आहे. जो कोणी भारतात गुंतवणूक करून कंपनी सुरु करणार आहे, त्याला तीन महिन्यांत सर्व परवानग्या देण्यात येतील. परदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी काम केले जात आहे. कोरोनानंतर देशात ही गुंतवणूक वाढेल, असा विश्वास देखील गडकरींनी यावेळी व्यक्त केला.

ट्रेंडिंग बातम्या-

मे महिन्याअखेरीस पुण्यातील रुग्णसंख्या 10 हजारावर पोहोचण्याचा अंदाज- आयुक्त शेखर गायकवाड

दिग्गजांना बाजूला सारत विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ युवा नेत्याला संधी

महत्वाच्या बातम्या-

पालघर हत्येच्या व्हिडीओतील नेतेमंडळी गृहमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरतात- प्रवीण दरेकर

“स्थलांतरीत मजुरांच्या दैन्यावस्थेला केंद्र सरकारचा असंवेदनशील कारभारच जबाबदार”

काँग्रेसकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी दुसरा उमेदवारही जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More