Loading...

महापालिकेचे 58 हजार कोटी फिक्स डिपॉझिट मात्र मुंबई दर पावसाळ्यात तुंबते!

मुंबई | मुंबई महानगरपालिकेचे बँकेत 58 हजार कोटी रूपये फिक्स डिपॉझिट आहेत. मात्र दर पावसाळ्यात मुंबई तुंबलेली दिसते, असा टोला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेला लगावला आहे. मुंबई महानगरपालिकेची इच्छाशक्ती असेल आणि त्यांनी जर मनात आणलं तर मुंबईचा समुद्रकिनारा मॉशिरसप्रमाणे काचेसारखा स्वच्छ होऊ शकतो, असं गडकरी म्हणाले.

पश्चिम उपनगरातील बोरीवलीच्या गोराईत पहिलं कांदळवन उद्यान उभं राहणार आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते.

Loading...

दिल्लीच प्रदूषण ‘नवीन प्रदूषण नियंत्रण’ योजनेमुळे जवळपास 26 टक्के कमी झालं आहे. फडणवीस जेव्हा नागपुरचे महापौर होते तेव्हा आपापलं टॉयलेटचं पाणी विकायचं, असा प्रकल्प माझ्या मनात आला, जो आम्ही प्रत्यक्षात उतरवला. इच्छाशक्ती असेल तर करता येतं, असं गडकरी म्हणाले.

दरम्यान, गडकरी नेहमी आपल्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेना काय उत्तर देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-नरेंद्र मोदींच्या ‘या’ सल्ल्यावर असदुद्दीन ओवैसी भडकले!

-“दबावशाही, झुंडशाही हे तर शिवसेनेचं वैशिष्ट्य”

-सैफ अली खानने स्मिता तांबेला दिली शाबासकी, म्हणाला…

Loading...

-धनंजय मुंडे शेतकऱ्यांना फक्त 10 रूपयांत जेवण देणार…!

-काँग्रेसला 70 वर्षांत जमलं नाही… आम्ही 75 दिवसांत करून दाखवलं- अमित शहा

Loading...